आचरा /-
विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांनी आचरा येथे केले.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून तीन स्तरावर
वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षिस वितरण स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत आणि समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते केले गेले.यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे,शिक्षक मधुरा माणगांवकर, रावले,सौ रावले,महाभोज आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
गट क्र.१ प्राथमिक गट
५ वी ते ७वी
प्रथम 1) सई अंकुशराव घुटूकडे
द्वितीय 2) पूर्वा परशुराम गुरव
तृतीय 3) सिया महेंद्र खोत
उत्तेजनार्थ 1)वेदिका पंढरीनाथ करवडकर
2) तनिष्का महेंद्र वारंग माध्यमिक गट
८ वी ते १० वी
प्रथम 1) वेदांत संतोष गोसावी
द्वितीय 2) सिद्धी किशोर पाटणकर
तृतीय 3) तेजस चंद्रशेखर कामतेकर
3) भूमी आशिष नाबर
उत्तेजनार्थ ऋतुजा रामेश्वर मांटे
उच्च माध्यमिक गट
इयत्ता १२ वी कला व वाणिज्य
१) प्रथम वैभवी नामदेव कदम
२) द्वितीय लिनता हेमंत मेस्त्री
३) तृतीय साक्षी विश्वजित मुणगेकर
उत्तेजनार्थ – उर्मिला प्रकाश कावले