नवी दिल्ली /-
आमदार, खासदारांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद संसदेत पोहोचला आहे. संसदेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयवर शिंदे गटाने ताबा मिळवल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालय आपल्याला मिळावे यासंबंधी मागणी केली होती.
विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या पत्रव्यवहारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांना तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांना मान्यता दिली होती. आता शिंदे गटाने शिवसेनाच्या कार्यालयावरच ताबा मिळवल्याने शिंदे गट आणि शिवसेना खासदार समोरासमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.