कामगार कल्याण तर्फे कुडाळ येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2022 संपन्न..

अमिता मठकर,कुडाळ /-

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ,चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ येथे दिनांक 21/07/2022 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2022-2023 महालक्ष्मि हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आली सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमांस अध्यक्ष मा.सो.आफरीन अब्बास करोल ( नगराध्यक्षा, कुडाळ नगरपंचायत), प्रमुख पाहुणे मा. श्री. तुषार सुभाष कर्णिक ( एल. आय.सी.शाखा प्रबंधक ,कुडाळ ) विशेष उपस्थिती म्हणून मा.श्री.मोहन गुरुनाथ होडावडेकर (कार्यकारी संचालक कॉर्न बॅक अध्यक्ष एम.आय.डी. सी.असोसिएशन), हेमंत मनोहर शिरसाठ ( उद्दोजक कुडाळ), मा.श्री.किरण वासुदेव गावकर( तज्ञ् संचालक .सिंधूविकास .शेड्युल.कास्ट इं.को.ऑफ.सोसा.ली.कडावल )मा.श्री. मोतीराम प्रभू .(एल. आय.सी. शाखा प्रबंधक कुडाळ) परीक्षक . श्री. अनिल आचरेकर , श्री. संजय आठले , श्री. महेश तळगावकर ,मा.श्री .संजय खोटलेकर (गुणवंत कामगार पुरस्कार ) तसेच मा.श्री. अरुण लाड ( गट कार्यालय, चिपळूण कामगार कल्याण अधिकारी ). सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत अरुण लाड ,कामगार कल्याण अधिकारी . गट कार्यालय चिपळूण यांनी केल तर सूत्र संचालन केंद्र संचालक कणकवली श्री . संतोष नेवरेकर, यानी केले तर कार्यक्रमचे आभार सुस्मिता नाईक. केंद्र, संचालक कुडाळ कामगार कल्याण केंद्र यांनी उपस्थित सर्व मान्यवर याचे आभार मानले कार्यक्रमला उपस्तिथ केंद्राचे संचालक होते.केंद्र संचालक कणकवली संतोष नेवरेकर , केंद्र संचालक महाड दीपक गायकवाड, चिपळूण गट कार्यालय लिपिक श्री. पालव , केंद्र प्रमुख सावंतवाडी , आराबेकर मॅडम , केंद्र प्रमुख रत्नागिरी शिंदे मॅडम , केंद्र प्रमुख चिपळूण गाडे मॅडम , जोशी मॅडम , मोरये मॅडम देऊळकर मॅडम , सावंत मॅडम , नाईक मॅडम ,हळदणकर मॅडम व कुडाळच्या केंद्र, संचालक सुस्मिता नाईक मॅडम , केंद्र सेवक दत्ताराम तळावडेकर व केंद्र संभासद उपस्थित होते सदर स्पर्धे मद्ये ,एकूण 9 संघानी भाग घेतला त्यात 1 )कामगार कल्याण केंद्र, महाड. 2)कामगार कल्याण केंद्र, पोफळी . 3)कामगार कल्याण केंद्र, चिपळूण 4).कामगार कल्याण केंद्र, चिपळूण कामगार वसाहत खेर्डी .5) कामगार कल्याण केंद्र, रत्नागिरी . 6)कामगार कल्याण केंद्र, कणकवली , 7)कामगार कल्याण केंद्र, कुडाळ .8)कामगार कल्याण केंद्र, कुडाळ ,कामगार वसाहत पिंगुळी .9)कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी या संघात स्पर्धा पार पडली सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक – कामगार कल्याण केंद्र, चिपळूण कामगार वसाहत खेर्डी .दुतीय क्रमांक – कामगार कल्याण केंद्र, कणकवली , तृतीय क्रमांक – कामगार कल्याण केंद्र, चिपळूण या संघानी पटकावलं तर प्रथम क्रमांक आलेल्या संघाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई ठाणे येथे जाण्याचा मान मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page