कुडाळ /-
केसरी गावाबरोबर शाळा आणी अंगणवाडी साठी दातृत्व दाखवून एन पी सी आय आणि काॅर्बेट फाऊंडेशन बांदा यांच्या सौजन्याने स्वखर्चाने सजावट बांधकाम तसेच गावातील तरूण वर्गाना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक भरीव योगदान दिले.
यावेळी एन पी सी आय च्या प्रतिनिधी रचना मॅडम आणि द काॅर्बेट फाऊंडेशन बांदा चे राजेश सकट यांचा शाल व श्रीफळ देऊन जि.प.सिंधुदुर्ग उप मुख्य कार्यकारी एकात्मिक बालविकास अधिकारी संतोष भोसले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.उपक्रमशील शिक्षक दिपक राऊळ यानी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक करून भेटकार्ड देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी भेटकार्ड , शुभेच्छा देणाऱ्या मुलांचे , रोशन राऊत,वृषाली पाटील यांचेही कौतुक करण्यात आले.
यावेळी केसरी प्रशालेचे मुख्याध्यापक कदम मॅडम, सुभाष सावंत ,,संतोष भोसले,विद्या कोतगी,देऊलकर,संचिता सावंत,सुचिता सावंत,स्मिता सावंत,रेश्मा जंगले,नेहा नाईक,अमोल केसरकर,सुमेधा सावंत,मयुरी सावंत,सुमन सावंत,नम्रता सावंत,आर्या सावंत,एकता सावंत ,मयुरी सावंत,धनश्री गोरे इत्यादी पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी नाईक,वैष्णवी सोमण यानी केले तर आभार सुभाष सावंत यानी मानले
