कणकवली /-
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकीची धडक बसून हुंबरठ येथील रस्त्याने जाणारे पादचारी मारुती टुप्पा लोहार (वय ५०, हुंबरट) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील जानवली बौद्धवाडीनजीक गुरूवारी सायंकाळी ८ – वा. सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी मारूती यांना प्रवीण कदम, किसन पवार, संतोष कदम, संदेश कदम इतर स्थानिकांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ते मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. धडक देणारा कारचालक मात्र पसार झाला आहे.यावेळी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस नाईक रुपेश गुरव, राणे आदी रुग्णालयात दाखल झाले होते. सदर अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
