नवी दिल्ली /-

द्रौपदी मुर्मूं यांच्या रूपाने भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या आहेत.त्यांच्या विजयाचा जल्लोष देशभर साजरा होत आहे. त्यांच्या गावातही सकाळपासूनच लोक आनंदोत्सव साजरा करत होते. शेकडो किलो मिठाई तयार करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले. महिला आदिवासी नृत्य करून मुर्मूंचा आनंद साजरा करत आहेत.

मुर्मूंचे मूळ गाव ओडिशातील रायरंगपूर येथे आहे.येथे मोठा उत्सव सुरू आहे. अनेक ठिकाणी मिठाई बनवली जात असून त्यांच्या गावासह आजूबाजूच्या अनेक गावातील लोक विजयी मिरवणुका काढत आहेत. मुर्मूंच्या घराबाहेर आदिवासी नृत्य सुरू आहे.मुर्मूंच्या गावात भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांनी शेकडो किलो लाडू तयार केले आहेत. त्यांच्या विजयावर लोक ते वाटून आनंद साजरा करत आहेत. मुर्मू यांच्या गावातील भाजपचे स्थानिक नेते तपन महंत यांच्या म्हणण्यानुसार, गावात वीस हजार लाडू तयार केले जात आहेत. अभिनंदन करण्यासाठी 100 बॅनर लावण्यात आले आहेत. दुसरीकडे, त्यांनी शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आठवण करून दिली की ती एक गुणवंत विद्यार्थिनी होती आणि तिला लोकांची सेवा करायची होती.

ओडिशातील द्रौपदी मुर्मू यांच्या घरी लोक उत्सव साजरा करत आहेत. लोक आपापल्या छतावर तिरंगा फडकावत भारत मातेच्या जयघोषासह ‘मुर्मू झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत.द्रौपदी मुर्मू यांच्या घराची सजावट करण्यात आली आहे. सर्व नातेवाईक घरी जमले आहेत. त्यांच्या मावशी सरस्वती मुर्मू म्हणाल्या की, द्रौपदी मुर्मूने महिला काय साध्य करू शकतात हे सिद्ध केले आहे. त्यांनी आयुष्यभर खूप संघर्ष केला. ते अथक संघर्षाचे फळ आहे. ती अतिशय नम्र आणि स्वभावाने प्रेमळ आहे. सुख-दुःखात ती नेहमी सोबत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page