कुडाळ /-
माणगाव खोरे हा ग्रामीण भाग असून याठिकाणी एन. सी.सी/ नीट/जेईई/इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करावेत जेणे करून येथील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल,विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हे सर्व उपक्रम अतिशय महत्वाचे आहेत यासाठी माजी विद्यार्थी सुद्धा आपल्या स्तरावर मदत करतील अस आश्वासन योगेश धुरी यांनी दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सगुण धुरी, उपाध्यक्ष दत्ताराम जोशी,सीईओ श्री आकेरकर सर,महेश भिसे,साई नार्वेकर, दत्तदिगंबर धुरी, बाली नानचे,योगेश धुरी,रमेश हळदणकर,शैलेश विर्नोडकर,उमेश देसाई आदि उपस्थित होते.
