सिंधुदुर्ग /-
मुंबई भाजपामार्फत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी विशेष श्री मोदी एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. दादर मध्य रेल्वे स्टेशन वरून सोडण्यात येणार आहे. सदर गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी या स्टेशनांवर थांबेल. एक्प्रेसचा जाण्या-येण्याचा खर्च मुंबई भाजपा करणार आहे. याकरिता प्रत्येक मंडला मधून कोकणात जाणाऱ्या ५० प्रवाशांची नावे (नाव, वय, मोबाईल नंबरसह) मंडल व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून पाठवायची आहेत. यासाठी प्रत्येकी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी सुनील राणे (संयोजक) – ९८१९६००००९, सुहास आडीवरेकर ( सह संयोजक) – ९६९२१०५५२, महेश पारकर ९८१९०८४३२०, भालचंद्र शिरसाट – ९८२०१२२६५७, राजेश शिरवाडकर – ९८६९३१३२२७, राकेश नेवरेकर – ९८१९९४६९०९, संतोष मेढेकर – ९५९४७५६६६६ या नंबरवर संपर्क साधावा.
