कुडाळ /-

या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक ८ जुलै २०२२ रोजी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नंबर १ येथील सात गरजू विद्यार्थ्यांना तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठोस मांजरदोरा येथील अकरा गरजू विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या एक पाटी गरजू विद्यार्थ्यासाठी या उपक्रमांतर्गत पाटी वाटप करण्यात आले. (टीप : गरजूंना मदत करताना फोटो काढणे योग्य वाटत नसल्याने प्रत्यक्ष वाटपाचा फोटो काढण्यात आलेला नाही.)

या उपक्रमासाठी पाटीसाठी दोडामार्ग येथील श्रीमती लता गोपाळ नाईक यांनी ८ पाट्यांचे सौजन्य केले तर माणगाव येथील सौ हेमांगी जोशी यांनी ६ पाट्यांचे , कणकवली येथील श्रीमती स्मिता नलावडे यांनी २ पाट्यांचे, पेंडुर खरारे येथील श्री अर्जुन पेंडूरकर यांनी २ पाट्यांचे सौजन्य केले सर्वांचे दुर्ग मावळा परिवाराकडून खूप खूप आभार..या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करू शकता अथवा या उपक्रमासाठी एक पाटी देऊन सहकार्य करू शकता. (पाटी सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना पाटी वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल) या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा Whatsapp च्या माध्यमातून संदेश पाठवा.९८६०२५२८२५/९४२२२६३८०२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page