सावंतवाडी /-

शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी सत्कार केला.गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती.ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले.यावेळी शौर्य दाखवत हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात उडी मारून जान्हवी शिंदे कणकवली हिला वाचवले.दरम्यान या शोर्यबद्दल आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देवून व ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,पत्रकार अनिल चव्हाण विजय राऊत यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. गेळे येथील सागर ढोकरे,बाबुराव गवस,रंजन बंड,तुषार बंड यांनी मारुतीची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देवून हवालदार दत्ता देसाई यांचा सत्कार केला.यावेळी उपनिरीक्षक अमित गोते,अभिजित कांबळे,दीपक शिंदे,संभाजी पाटील,राजेश नाईक पोलीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page