कुडाळ /-


पंचायत समिती आपले घर आहे आणि या घराच्या प्रांगणात वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा करण्याचा वसा कायम स्वरूपी राबवू असे प्रतिपादन कुडाळ तालूका पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज केले कृषी दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला तसेच कृषीदिनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला
हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त आज पंचायत समिती कुडाळच्या सभागृहात पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी श्री विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन ,कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यास भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर कुडाळ तालुका कृषी अधिकारी डॉ अश्विनी घाटकर सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब प्रगतशील शेतकरी श्री नारायण चेदवणकर माजी प स सदस्य बाळकृष्ण मडव संदेश किंजवडेकर श्रीमती पाटकर प्रफुल्ल वालावलकर तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक कृषी पर्यवेक्षक आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले भारत हा कृषिप्रधान देश आहे कोकणात शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आज पंचायत समितीच्या प्रत्येक विभागात आमच्यासह कर्मचारी काम करतो हा सुद्धा शेतकरी आहे हाच उदात्त दृष्टिकोन ठेवून या कर्मचारी शेतकऱ्याच्या माध्यमातून एक एक रोप खरेदी करत आज कृषी दिनाच्या निमित्ताने पंचायत समितीच्या प्रांगणात लावून कृषी दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती परिसर विविध नाविन्यपूर्ण शोभिवंत रोप लॉन आदी उपक्रमाने सजला असल्याचे सांगितले डॉ घाटकर यांनी कृषीविषयक योजना सांगितल्या श्री मडव यांनी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्याचे आवाहन केले श्री परब यांनी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषीक्षेत्रातील दैदीप्यमान प्रवासाचा
आढावा घेतला प्रगतशील शेतकरी श्री चेदवणकर यांनी कृषि विषयक तसेच परस बाग लागवड या विषयी मार्गदर्शन केले कृषी दिनाच्या औचित्याने तालुक्यातील आदर्श फळबाग व बाबू लागवड करणा-या शेतक-याचा सत्कार करण्यात आला तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग /बाबू लागवडीत उत्कृष्ट कामगिरी करणा-या ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक व ग्रामरोजगारसेवक याचाही सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा पत्रकार संघ जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले उमेश तोरसकर व जिल्हा सदस्य राजन नाईक यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पंचायत समिती परिसरातील क्षेत्रात फळरोपाची व शोभिवंत झाडाची लागवड करण्यात आली
बॉक्स
कर्मचारी बनला शेतकरी
पंचायत समितीचा अधिकारी कर्मचारी असला तरी तो शेतकरी आहे याचअधिकारी कर्मचारी यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या प्रांगणात प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यानी विविध झाडे लावत कुडाळ पंचायत समितीने कृषी दिन आगळ्यावेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमानी साजरा केला दरवर्षी कृषी दिन हा ग्रामीण भागात शेतावर जाऊन लागवड करून विविध उपक्रमाने उपक्रमांनी साजरा केला जात असे या वर्षी मात्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या प्रांगणातच हा नवीन उपक्रम राबविण्यात आला
कुडाळ
कुडाळ पंचायत समितीच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष उमेश तोरसकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन नाईक यांचा सत्कार करताना प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण व मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page