कुडाळ /-

सावंतवाडीवरून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या व कुडाळहुन सावंतवाडीच्या दिशेला जाणाऱ्या दोन वाहनात कुडाळ आर एस एन हॉटेलसमोर भीषण अपघात झाला. MH 09 FV 9554 ही रेनो कार सावंतवाडी हुन कोल्हापूर दिशेला जात होती. मिनी आयशर टेम्पो MH 07 X 1884 रस्ता क्रॉस करत असतेवेळी हा अपघात झाला

गेले अनेक दिवस धोकादायक बनत चाललेली ही जागा झाली आहे कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे झालेल्या ठिकाणी तातडीने दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत श्री गोसावी आणि श्री महाडिक हे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.

गेली अनेक दिवस कुडाळ शहरात प्रवेश करणाऱ्या या भागात अनेक वेळा अपघात घडत आहेत. यापूर्वी झालेल्या प्रांताधिकारी व महामार्ग अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पोलीस निरीक्षक श्री मेंगाडे यांनी याकडे गंभीरपणे लक्ष वेधले होते. पोलिसांना आवश्यक त्या सूचना देत वाहतूक दुसरीकडुन वळवण्याची भूमिकाही त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली होती. महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष आणि बेफिकीरी दाखवत असल्याने आता श्री मेंगाडे कठोर भूमिका घेणार असल्याचेही सूत्रांकडून समजते. अपघातस्थळी रस्त्यावर ऑइल सांडले असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. तूर्तास आजतरी इथली धोकादायक स्थिती लक्षात घेता नागरिकांनी याठिकाणी प्रवास करताना स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page