कुडाळ /-
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूलमधील इयत्ता दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी वह्या वाटप कार्यक्रम होत असतात. शासनामार्फत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येते परंतु नववी ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची किंमत जास्त असल्याने गरीब विद्यार्थ्यांना ती परवडणारी नसतात. दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागामार्फत वह्या वाटप न करता इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूलमधील गरजू आठ विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे आठ सेट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर कोराणे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या आठ सेट साठी कुडाळ येथील रिगल मेडिकलचे मालक श्री अनिस दोस्ती यांनी सौजन्य केले. या उपक्रमास सौजन्य केल्यामुळे दुर्ग मावळा परिवारातर्फे श्री अनिस दोस्ती यांचे खूप खूप आभार
.
(टीप :गरजूंना मदत करताना फोटो काढण