कोल्हापूर /-

केंद्रीय संचार ब्युरोच्या (Central Bureau of Communication) कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी तसंच नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

आज सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालय इथं कॉमन योग प्रोटोकॉल वर आधारित योग प्रात्यक्षिकं करण्यात आली. यावेळी गार्गी भट या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या योगपटूसह मुला-मुलींच्या चमूने योग प्रात्यक्षिके सादर केली. योग प्रशिक्षक रवी कुमठेकर यांनी मार्गदर्शन केले.

यात जिल्हाधिकारी राहूल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे, क्षेत्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांच्यासह कोल्हापुरातील आबालवृद्ध स्त्री-पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पतंजली योग समुहाचा चमू देखील यावेळी सक्रियपणे सहभागी होता.

नेहरू युवा केंद्रा मार्फत झालेल्या तालुका स्तरावरील योग स्पर्धांचं बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आलं. तसेच नेहरू युवा केंद्रातर्फे खेळ साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page