वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची १४ मे रोजी महत्वाची बैठकवेंगुर्ला -वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची दि.१२ मे रोजी होणारी मासिक बैठक दि.१४ मे रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय सभागृहात जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या बैठकीत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दि.२६ ते २९ मे या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या दौऱ्यात या अभियानाची यशस्विता साधण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात येणार आहे.तसेच आगामी काळात होणाऱ्या जि.प., पं.स. व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ निहाय आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व फ्रंटच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page