गोवा /-
गोवा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज साखळी मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा संपन्न झाली.यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू,माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी,आमदार रमेश कोरगावकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर , संजय पडते, संदेश पारकर, आदिंसह गोवा व सिंधुदुर्ग येथील स्थानिक पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
