वेंगुर्ला /-
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या येणे दूध बिल व पुढील वाटचाल यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शरद कृषी भवन ओरोस येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे मार्गदर्शन करणार असून यावेळी म्हैस दूध अधिक २० हजार लिटर पर्यंत वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमावर सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे. तरी यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकरी, संस्था प्रतिनिधी व संघाचे सभासद, इच्छुक दूध उत्पादक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा दूध संघ अध्यक्ष एम. के. गावडे यांनी केले आहे.