रत्नागिरी /-
राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तळ कोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणता पुढचे तीन दिवस अलर्ट जारी केला आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणच्या नद्यांना पुराचे स्वरूप आले असल्याने नदी काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.