नवी दिल्ली /-
नोटबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा बंद होतील किंवा त्यांची छपाई बंद केल्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शनिवारी लोकसभेत २ हजार रुपयांच्या नोटेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली.अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितलं की, २ हजारांच्या नोटांची छपाई बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लोकसभेत लेखी उत्तरामध्ये त्यांनी म्हटलं की, सरकार कोणत्याही चलनातील नोटेबद्दल निर्णय घेण्याआधी आरबीआयचा सल्ला घेते. यामध्ये सर्वासामान्यांसाठी पुरेशा नोटा उपलब्ध करून देण्याचा समावेश असतो.