सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील पंचायत समितीतीला तब्बल दिड वर्षानी हक्काचा गटविकास अधिकारी मिळाला आहे. त्या ठिकाणी आज रविंद्र कणसे हजर झाले आहे. त्या ठिकाणी प्रभारी कार्यरत असलेल्या वासुदेव नाईक यांची ओरोस येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली आहे. दरम्यान आज कार्यभार स्वीकारलेल्या श्री. कणसे यांचे जिल्हा परिषद सभापती शर्वाणी गावकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, वासुदेव नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page