वेंगुर्ला /-


स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव ( ७५ वर्षे ) वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शिरोडा ग्रामपंचायत येथे इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच व्यवसाय अभ्यासक्रम व इतर क्षेत्रात नाविन्यपूर्ण विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व संकटांवर मात करत या विद्यार्थ्यानी सुयश मिळविले, अशा विद्यार्थ्याचा पुढील शैक्षणिक वाटचालीस आत्मविश्वास वाढावा यासाठी कौतुकाची थाप म्हणून सत्कार करून विदयार्थ्याना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आली.यावेळी शिरोडा गावचे तलाठी फिरोज खान यांनी गावासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण व
आरोग्य सभापती तथा जि.प. सदस्य प्रितेश राऊळ उपस्थित होते.विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्व विदयार्थ्यांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.यावेळी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे , रवी पेडणेकर, कौशिक परब , मयुरी राऊळ , समृद्धी धानजी, प्राची नाईक आदी उपस्थित होते.यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रितेश राऊळ,फिरोज खान व सरपंच मनोज उगवेकर यांनी आपल्या मनोगताद्वारे उपस्थित विद्यार्थ्याना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page