नवी दिल्ली /-
आपल्या खात्यात फ़क़्त ३ हजार रुपये आहेत आणि आपल्याला जर कर्ज हवे असेल तर कोणी देईल का? ३ हजार असताना १ लाखाचेही कर्ज मिळणे अशक्य वाटत असतानाच आता आयसीआयसीआय बँकेने अशा पद्धतीने थेट ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तयारी केली आहे.
ICICI होम फायनान्स यांनी ही नवी लोन स्कीम लागू केली आहे. असंघटीत क्षेत्रातील कष्टकऱ्यांना घर घेण्यासाठी २ लाख ते ५० लाख रुपये कर्ज देणारी ही स्कीम सध्या फ़क़्त दिल्ली राज्यामध्ये चालू झालेली आहे.
मात्र, या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वाटत आहे. शहरात काम करणारे इलेक्ट्रिशियन, प्लंबर, पेंटर, छोटे उद्योजक, किराणा दुकानदार आणि इतरांसाठी ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे.२० वर्षांमध्ये या गृहकर्जाची परतफेड करावी लागणार आहे. त्यासाठी ५ लाखापर्यंत १५०० रुपये आणि त्यापेक्षा जास्त कर्ज रकमेसाठी ३००० रुपयांपर्यंत हफ्ता असणार आहे.याद्वारे घर घेऊन ग्राहक प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाई) योजनेद्वारे २.६७ लाख रुपये अनुदान योजनेचाही लाभ घेऊ शकतो.