कणकवली /-

भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा झाली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.

एकूणच राज्याच्या विकासात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पदाचे महत्वपूर्ण योगदान राहणार आहे. काल गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी या नेत्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना भेट देवून शुभेच्छा दिल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page