कुडाळ /-

करोना महामारीमुळे सिंधुदुर्गातील दशावतारी कलावंत अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत या कलेवर उपजीविका असणारे कलाकार संकटात सापडलेले आहे त्यांना सामाजिक भावनेतून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य पुरवठा केला यासाठी तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी पुढाकार घेतला आणि कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सोमवार दिनांक 5/7/21 रोजी या वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी कलाकारांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. राजन तेली, उपाध्यक्ष रणजित देसाई ,तालुकाध्यक्ष विनायक राणे ,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली ,शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष रूपेश कानडे ,राजू राऊळ, देवेंद्र नाईक, संदेश नाईक ,सुनील बांदेकर ,बंड्या सावंत ,विजय कांबळी ,गजानन वेंगुर्लेकर, सोशल मीडिया चे अविनाश पराडकर, राजवीर पाटील महिला शहराध्यक्ष सौ ममता धुरी, रेवती राणे, रेखा काणेकर, प्रसन्ना गंगावणे ,संजय परब , सामाजिक कार्यकर्ते राजेश महाडेश्वर, सुमित बांबुळकर ,देवराज राणे, राजू बक्षी ,निलेश तेंडुलकर, शेखर राणे ,सुप्रसिद्ध समालोचक राजा सामंत यांसह कुडाळ तालुक्यातील दशावतारी कलावंत उपस्थित होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार दशावतारी कलाकारांच्या वतीने श्री. बच्चू कोंडुरकर ,श्री. वालावलकर यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page