पिंगुळी /-
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत चालल्याने प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोरोनाविषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व आपला गाव कोरोना मुक्त करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव कोरोना मुक्त करण्यासाठी पिंगुळी गावात 7 जून ते 12 जून पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय पिंगुळी ग्रामपंचायतने घेतला आहे. तसेच विनाकारण कोण घरा बाहेर पडत असेल तर त्याची रॅपिट टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती पिंगुळी सरपंच निर्मला पालकर यांनी दिली आहे.
सोमवार दिनांक 7 जून ते शनिवार दिनांक 12 जून या सात दिवसाच्या कालावधीत हे कडक लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच विना मास्क किंवा विनाकारण फिरताना आढळल्यास दोनशे रुपये दंड करून त्याची रॅपिड टेस्ट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायत बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीत पिंगुळी सरपंच सौ. पालकर यांच्या समवेत, ग्रामसेवक श्री. घुगे, तलाठी श्री. दरेकर, कृषी सहाय्यक सौ.हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर, बाबल गावडे, दिव्या गावडे, सिद्धार्थ धुरी, व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील मापसेकर, उपाध्यक्ष दीपक गावडे, सचिव सतीश माळी आदी उपस्थित होते.
सदर सभेमध्ये संपूर्ण पिगुळी गावात सहा दिवसाचे कडक लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लोकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 5 जून ते रविवार 6 जून या दिवशी दुकाने सकाळी सात ते अकरा पर्यंत सुरू राहतील व शासकीय नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल. सोमवार 7 जून ते शनिवार 12 जून रोजी बारा वाजेपर्यंत गावातील सर्व दुकाने पूर्णतः बंद राहतील सहा दिवस कडक लॉकडाऊन करूनही परिस्थिती सुधारली नाही तर पुढील दिवसात परत लॉकडाऊन केले जाईल अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
◾लॉकडाउन काळात काय सुरू राहील काय बंद? ; ग्रामपंचायत नियमावली
१. लॉकडाउन काळात गावातील रेशन दुकाने बंद राहतील.
२. एखादी व्यक्ती वीना मास्क विनाकारण फिरतना आढळल्यास दोनशे रुपये दंड करून त्याची रॅपिड टेस्ट केली जाईल.
३. सरकारी नोकरदारांना कार्यालयात जाण्यासाठी ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
४. बाहेरगावावरून आल्यास हे रॅपिट टेस्ट करणे बंधनकारक राहील तसेच सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास ग्राम विलीनीकरण कक्षात 10 दिवस ठेवले जाईल होम कोरंटाईन राहता येणार नाही.
५. गावात डॉक्टर मेडिकल स्टोअर्स नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
६. रुग्ण मिळाल्यास रुग्णांच्या आजूबाजूच्या लोकांची टेस्ट करण्यात येणार आहे.
७. बाहेरगावी जाणार्या प्रवासी किंवा डॉक्टर जवळ जाणार रुग्णांना रिक्षेने सोडण्यास सवलत देण्यात आली आहे.
८. धार्मिक सण व धार्मिक कार्यक्रम आपण आपल्या घरा पुरते मर्यादित ठेवून करायचे आहेत.
९. डॉक्टर कडील औषधे चालू आहेत त्यांनी आठ दिवसाचे औषधे आणून ठेवावित.
१०. व्यापारी गाड्या घेऊन गावात माल किंवा भाजी विक्री करताना आढळल्यास पंधरा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
११. व्यावसायिकांची दुकाने व घरगुती दुकाने छुप्या पद्धतीने चालू आढळल्यास त्यांच्यावर रक्कम पंधरा हजार रुपये दंड आकारला जाईल व पोलीस केस दाखल करण्यात येईल.