आमदार नितेश राणे यांनी घेतला पुडाकार.
रेड झोन मधून सिंधुदुर्गला बाहेर काढण्यासाठी घेतली बैठक!
सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्हाला कोरोनाच्या रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी आणी रुग्णांचे प्राण वाचवीण्यासाठी आम. नितेश राणे यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालय गाठले! जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वार्ड मधे आतापर्यन्त सुरु असणारा नातेवाईकांचा प्रवेश तातडीने बंद केला. जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आणी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रिपाद पाटिल यांच्याशी चर्चा करीत तातडीने धोरण ठरवीले. आणी त्यांची अंम्मलबजावणी तात्काळ सुरु केली.
कोरोणा रुग्णांची वाढती संख्या कोरोना रुग्णांचे वाढते मृत्यू व रेड झोन मधे गेलेला जिल्हा यातून या जिल्हातील नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासन व पोलीसांनी कडक धोरण स्विकारावे अशी विनंती आमदार नितेश राणे यांनी बुधवारी केली. आयसी एम आर च्या सुचनांप्रमाणे व केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोना रुग्णांच्या वार्ड मधे नातेवाईकांना प्रवेश तातडीने बंद करावा यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले व जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रिपाद पाटिल यांच्या सोबत एक बैठकच घेतली. या नातेवाईकांच्या कोरोना वार्डातील प्रवेशामुळे ते नातेवाईकच कोरोणा स्प्रेडर होत आहेत त्यामुळे याबात ठोस निर्णय व्हावा व कोरोना वार्ड मधील रुग्णांच्या नातेवाईकांचा प्रवेश तत्काळ बंद करावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकाराची भूमिका घेतली. व याच बैठकीत धोरण ठरले व त्याची अम्मलबजावणी सुरु झाली. यावेळी जि. प. च्या अध्यक्षा सौ. संजना सावंत आरोग्य सभापती डाॅ अनिशा दळवी. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ महेश खलिफे, प्रभाकर सावंत, दादा साईल, भाई सावंत, सुप्रिया वालावलकर संतोष वालावलकर,निलेश तेंडुलकर,देवेन सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपला छोटासा जिल्हा असताना व स्वच्छता व अन्य सरकारी उपक्रमांमध्ये जिल्हा नंबर वन असताना कोरोना रुग्णसंख्या वाढून हा जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. दरदिवशी करुणा मृत्यूंची संख्याही वाढत आहे. कोरोणामधे हा जिल्हा नंबर वन कसा ठरला? याबाबत काहीतरी चुकत असल्याबाबत व त्या चुका सुधारण्याबाबत धोरण निश्चित व्हायला हवे त्याची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला. जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे दरदिवशी पाच ते सहा हजार लोकांचे टेस्टिंग केले जात आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे यांनी दिली तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी नागरिकांमध्ये आणखी जनजागृती व्हायला हवी कंटेंन्टमेंन्ट झोन व लाॅकडाउन बाबत जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित आहे असे मत व्यक्त केले. काही रूग्ण घरामध्ये पाच सहा दिवस उपचार घेतल्यानंतर अखेरच्या क्षणी जिल्हा रुग्णालयात दाखल होतात व नंतर त्यांच्यावर उपचार करणे कठीण होते व अशा काही रुग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागते. मात्र जे रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल होतात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करून बरे होऊन घरी गेलेले अाहेत. जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा रुग्णावर उपचार करणारी यंत्रणा आहे तसेच जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कोरोणा रुग्णांचा शोध घेऊन सरकारी रुग्णालयापर्यन्त पोहचवीणारी यंत्रणा असून या दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधावा व कोरोणा रूग्णांना मदत करावी अशा सूचनाही नितेश राणे यांनी दिल्या.
जिल्ह्यात कोरोणा रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे 108 टोल फ्री अँम्बुलन्स वर मोठा भार पडतो. व पॉझिटिव्ह रुग्णांना अँम्ब्युलन्स मिळण्यास विलंब होतो. व त्या काळात हे रुग्ण स्प्रेडर होऊन अनेक नागरिकांच्या संपर्कात येतात व रुग्ण संख्या वाढते ही अडचण लक्षात घेऊन आमदार नितेश राणे म्हणाले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकानीही याबाबतचे जबाबदारी घ्यावी व रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी मदत करावी अशा सूचना दिल्या.
सिंधुदर जिल्हा रेडझोन असतानाही लसीकरणामुळे आपण मागे आहोत. पुन्हा मुंबई नागपूर या जिल्ह्यांना लस प्राधान्यक्रमाने मिळाली आहे. हे जिल्हे रेडझोन असल्यामुळे त्यांना जादा प्रमाणात लस दिली गेली होती तशीच रेड झोन असलेल्या सिंधुदुर्गसाठी मिळावी याकडेही आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. याबाबतचा पाठपुरावा करावा व लसीकरणावर भर द्यावा अशा सूचनाही दिल्या.
जिल्हा रुग्णालयातील नर्सेस व सुरक्षा रक्षक याच्या प्रश्नाबाबत आमदार नितेश राणे यांनी २ जून पर्यन्त जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मुदत दिली होती. त्याबाबतची पडताळणीही त्यांनी यावेळी केली.