पुणे /-
लॉकडाऊनमुळे पर्यटनस्थळांवरील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या कोरोनाच्या व कोरोनानंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना हाती घेतल्या आहेत. “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून महामंडळाचे कर्मचारी काम करुन एमटीडीसी केंद्राचा परिसर, खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवत आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि नियमिपणे निर्जंतुकिकरण केले जात आहे.
लॉकडाऊनमुळे पर्यटनस्थळांवरील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या कोरोनाच्या व कोरोनानंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना हाती घेतल्या आहेत. “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून महामंडळाचे कर्मचारी काम करुन एमटीडीसी केंद्राचा परिसर, खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवत आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणिनियमिपणे निर्जंतुकिकरण केले जात आहे.
कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या तरुणाईला व पर्यटकांना एमटीडीसीकडून ‘वर्क विथ नेचर ‘ ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेत कामाचा व पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. पुण्यातील पानशेत, कार्ला, माथेरान, आणि माळशेज घाटातील एमटीडीसीच्या केंद्रांवर या सुविधेचा लाभ घेता येईल.पर्यटन केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन एमटीडीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुन्हा एमटीडीसीचे रिसॉर्ट खुले करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे सर्वच घरी बंदिस्त असलेल्या वातावरणात शारीरिक व मानसिक दृष्ट्या त्रासले आहेत. अनेकांना घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात मोकळेपणाने श्वास घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे एमटीडीसीने ‘ वर्क फ्रॉम होम ‘ ऐवजी ‘ वर्क विथ नेचर ‘ अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.ऑनलाईन पद्धतीने काम करण्यासाठी वाय फाय व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एमटीडीसीच्या केंद्रावर येणाऱ्या पर्यटकांसमोर त्यांना दिली जाणारी खोली निर्जंतुक केली जाते. त्यानंतरच पर्यटकांना खोलीत प्रवेश दिला जाते.
सध्या पानशेत, कार्ला, माथेरान माळशिरस घाट येथील रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहेत. सुमारे ३५ ते ४० टक्के पर्यटक एमटीडीसीच्या केंद्रावर पर्यटनासाठी येत आहेत. महाबळेश्वर व भीमाशंकर येथील रिसॉर्ट शासनाने अधिग्रहीत केले आहेत. परंतु, टप्प्याटप्प्याने एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट सुरू करण्यात येणार आहे. ‘ वर्क विथ नेचर ‘ साठी पर्यटकांना वायफाय व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
– दिपक हरणे,प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.