मालवण /-
तौक्ते चक्रीवादळामुळे कोळंब सर्जेकोट येथील अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती त्यांनी घेतली. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून छप्परासाठी पत्रे कौले देण्यात येतील. शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी दिले. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महादेव कांदळगावकर, विजय नेमळेकर, ग्रा. प सदस्य विनय कोळंबकर, सौ शेलटकर, भारती आडकर, नरहरी परब, साबाजी देऊलकर, अंजली शेलटकर, अरुण देऊळकर, सायली मायबा, जयवंत मायबा, विठोबा गिरकर, महादेव कुर्ले, पंढरीनाथ करवडकर आदी उपस्थित होते.