शिवसेनेच्या गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान मोहिमेस कट्टा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..

शिवसेनेच्या गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान मोहिमेस कट्टा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..

मालवण /-


कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी ’गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे रक्तदान’ हा नारा देत शिवसेना पेंडुर विभागातर्फे नाथ पै सेवांगण कट्टा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लसीकरणाच्या पूर्वी जिल्ह्यातील तरूणाईने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले.
गाव तिथे शाखा आणि शाखा तेथे रक्तदान हा नारा देत शिवसेनेच्यावतीने तालुक्यात रक्तदान शिबिर मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पेंडूर विभागाच्यावतीने कट्टा येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संपूर्ण तालुक्यातील तालुक्यातील गावांमध्ये रक्तदान शिबीराची मोहीम यशस्वीपणे राबविणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली. दानशुर रक्तदात्यांचे शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, महिला तालुकाप्रमुख श्‍वेता सावंत, सेवांगणचे कार्याध्यक्ष दिपक भोगटे, डॉ. सावंत, अण्णा गुराम, बाबू टेंबुलकर, महेश गावडे, दर्शन म्हाडगूत, देवदास रेवडेकर, प्रशांत भोजने, दादा वायंगणकर, विष्णू लाड, बाबू कांबळी, गोट्या पवार, प्रदीप सावंत, राजू गावडे, संदीप सावंत, शिरीष गोंदळी यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे डॉक्टरांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..