कुडाळ कोविड सेंटर येथे ऑक्सिजनबेड तातडीने पुरविण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचे तहसीलदार यांना निवेदन..

कुडाळ कोविड सेंटर येथे ऑक्सिजनबेड तातडीने पुरविण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचे तहसीलदार यांना निवेदन..

कुडाळ /-

कुडाळ कोविड सेंटर येथे ऑक्सिजनबेड तातडीने पुरविण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.कुडाळ तालुक्यातील कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी महिला व बाल रुग्णालयात सुरु केलेल्या सेंटरमध्ये किमान 10 ऑक्सिजन बेडची व्यवस्था तातडीने करण्यात यावी.माझ्या माहितीप्रमाणे या केंद्रात आपण कमी त्रास असलेल्या रुग्णांनाच दाखल करत आहोत पण जर अचानक एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली तर ओरस येथील रुग्णालयात नेईपर्यंत उशिर होण्याची शक्यता आहे आणि त्याशिवाय तिथे बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्ण अत्यवस्थ होण्याची शक्यता जास्त निर्माण होते.त्यामुळे कुडाळ च्या कोव्हिडं सेंटरला ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्यास जिल्हा रुग्णालयात बेडची व्यवस्था झाल्यावर पेशंटला शिफ्ट करायला सोपे पडेल आणि रुग्णाची होणारी हेळसांड कमी करता येईल.भाजपच्या वतीने आमच्या कडून यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सदैव उपलब्ध आहोत. असे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांनी आज कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली ,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रणजित देसाई,नगरसेवक सुनील बांदेकर ,भाजपचे जिल्हाचिटणीस बंड्या सावंत ,शक्तिकेंद प्रमुख राजू बक्षी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..