सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार करणार १ मे.रोजी कामगारदिनी कुडाळ पोलीस ठाण्यात उपोषण..

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार करणार १ मे.रोजी कामगारदिनी कुडाळ पोलीस ठाण्यात उपोषण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील बदलीपास घोटाळ्यास जबाबदार असणार्‍या संबधित वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुडाळ पोलिसांकडे करुन सुध्दा संबधितांवर अद्याप पर्यत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा,या मागणीसाठी कुडाळ पोलिस ठाण्यासमोर १ मेला उपोषण करू,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी दिला आहे.दरम्यान हे कृत्य शासकीय कर्तव्याचा भाग नाही. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वनखात्याची परवानगी घेणे आवश्यक नाही, तसेच वनखात्याकडे संबधित प्रकरण पाठवून अहवालाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही, याबाबत उच्च न्यायालयाचा हवाला देखील त्यांनी जोडला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे.यात असे म्हटले आहे की, माहीतीच्या अधिकाराखाली सावंतवाडी वनविभागातील कुडाळ वनक्षेत्रातील माणगाव परिमंडळामध्ये बदलीपास रॅकेट असल्याचे आपण उघड केले होते. त्यानंतर घातलेल्या माहीतीच्या अधिकारात तब्बल १७ प्रकरणे अशा प्रकारची झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आपण या प्रकरणी संबधित वनपालावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुडाळ पोलिसांकडे केली होती. मात्र अद्याप पर्यंत संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे श्री बरेगार यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..