कणकवली-कळसुली येथे ३२ लाखाची दारू जप्त.;राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..<br>४३ लाखाच्या मुद्देमालासह एक ताब्यात…

कणकवली-कळसुली येथे ३२ लाखाची दारू जप्त.;राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..
४३ लाखाच्या मुद्देमालासह एक ताब्यात…

कणकवली /-

कणकवलीत बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कणकवली येथे कळसुली फाट्यावर केलेल्या कारवाईत तब्बल ४३ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर या प्रकरणी कृष्णा दुलाराम शिटोळे (वय ३२) रा.मध्यप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. यात दारु वाहतूकीत वापरण्यात आलेला ११ लाखाच्या ट्रकसह ३२ लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे.. ही कारवाई अधिक्षक श्री. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ राणे, एस, एस चौधरी,स्नेहल कुवेसकर यांच्याकडून करण्यात आली.

अभिप्राय द्या..