कणकवली /-
कणकवली शहरात १ ते १० मे या दरम्यान जनता कर्फ्यू सुरू राहणार आहे. यात मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, आस्थापने, कार्यालये एवढेच नव्हे तर मंगल कार्यालये देखील बंद ठेवली जाणार आहेत. सर्व पक्षांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटना प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली. कणकवलीच्या जनता कर्फ्यूमध्ये भाजी विक्रेते, बेकरी, किराणा दुकाने, खासगी कार्यालये, सुपर बाजार, पान टपऱ्या आदी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आम्ही संबंधितांना दिले आहेत. १ ते १० मे या कालावधीत फक्त दवाखाने आणि मेडिकल दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. तर दूध विक्रेत्यांनी सकाळी सहा ते आठ या वेळेत घरपोच डिलिव्हरी द्यावयाची आहे असेही श्री. नलावडे म्हणाले.