किराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

किराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी/-

जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी), कृषी अवजारे व शेतमालाशी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामासाठी व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी साहित्य विक्री करणारी दुकाने ही सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंतच चालू ठेवता येतील. तथापी या दुकानांना सकाळी ७.०० ते रात्री ८.०० पर्यंत घरपोच सेवा (Home delivery) देता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

अभिप्राय द्या..