वेंगुर्ला /-
तालुक्यातील उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या प्रयत्नातून भेंडमळा येथे मंजुर झालेल्या हायमास्टचे उदघाटन सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.नागरी सुविधा योजनेमधुन सुमारे २ लाख ५६ हजार २३३ रुपये निधी खर्च करून हा हायमास्ट उभारण्यात आला. या उदघाटन कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य दया खर्डे, गणेश चेंदवणकर, शिवाजी पडवळ तसेच ग्रामस्थ आंनद नवार, प्रशांत नवार, सलील कांबळी, आनंद अणसुरकर, कैलास रेडकर व भेंडमळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.