कुडाळ /-
गोवा राज्यात डंपर व्यावसायिकांना होणारा विरोध व गोव्यातील स्थानिक व्यावसायिकांकडून होणारा त्रास यावर *शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा लोकमान्य डंपर संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.कार्तिक उर्फ मिलिंद परब* यांनी यशस्वी तोडगा काढला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.डॉ. प्रमोदराव सावंत यांच्याशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढला. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रातील डंपर हे रीतसर पास घेऊन अधिकृतपणे गोवा हद्दीत येण्यास मुख्यमंत्री मा.डॉ.प्रमोद सावंत यांनी ग्रीन सिग्नल दिला.
मिलिंद परब यांनी हा प्रश्न सोडवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य डंपर मालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
आज शिवसेना शाखेत त्यांच्या या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री.राजन नाईक, शिवसेना ओ बी सी सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.रुपेशजी पावसकर, सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्री.विकासभाई कुडाळकर, अतुलराव बंगे, ओबीसी सेलचे कुडाळ तालुकाध्यक्ष मिलिंद खोत, पिंगुळीचे ग्रा. पं. सदस्य भरतशेठ परब, शिवसेना विभागप्रमुख गुरू सडवेलकर, स्वप्नील शिंदे, चेतन राऊळ, अण्णा काराने आदी उपस्थित होते.