कुडाळ/-
कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सर्व जनतेमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी अद्याप जनतेकडून शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. जनतेने स्वःता हून खबरदारी घेतली तर कोरोना व्हायरस फैलाव रोखण्यासाठी मोठी मदत होईल. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत हे नियम सर्रास पणे गांभीर्याने न घेता लोक बिनधास्तपणे सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे सोशलडिस्टन्सचा बोजबारा उडालेला आहे. मार्केट मध्ये तोबा गर्दी दिसून येते. त्यामुळे व्हायरसचा प्रसार थांबणे ऐवजी तो मोठ्या प्रमाणात तालुक्यात. तसेच जिल्ह्य़ात पसरत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी लाॅकडाऊन पेक्षा जनता कर्फ्यू जाहीर करावे.अशी, मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संग्राम सावंत यांनी केलेले आहे.