कुडाळ /-
यशस्विनी सामाजिक संस्था आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच तालुका आरोग्य कार्यालय कुडाळ, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलन करिता वेगवेगळ्या ठिकाणी क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.यात , कुडाळ पंचायत समिती, एसटी स्टँड कुडाळ, रेल्वेस्थानक कुडाळ, पिंगुळी तिठा, ग्रामीण रुग्णालय कुडाळ, नेरूर चव्हाटा इ. ठिकाणी जनजागृती करण्यात आली.क्षयरोग उच्चाटंन गाठण्याची हीच वेळ आहे, हा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच क्षयरोग जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मास्क व पोस्टर्स चे वाटप यावेळी करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कुडाळ, कणकवली, वैभववाडी व देवगड येथील तालुका आरोग्य अधिकारी, संस्थेचे अध्यक्ष अमर निर्मळे, सचिव माया रहाटे , नंदकिशोर फोंडेकर, रोहन शारबिद्रे, टी बी समुपदेशक, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. प्रभाकर सावंत, प्रथमेश कदम, नेहा सावंत, प्रतीक्षा पोपकर, तृप्ती धुरी, अन्वीता जाधव आणि प्राजक्ता वजराटकर यांनी पथनाट्य केले.सदर कार्यक्रम राबविण्यास कुडाळ, कणकवली, वैभववाडी व देवगड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांनी सहकार्य केले.