कुडाळ /-
कुडाळ बसस्थानक नवीन इमारत बांधणे व अंतर्गत सुसज्जता यासाठी आपण एस टी मंडळाच्या खात्याचे मंत्री झाल्यावर माझ्या मागणीनुसार आकर्षक बसस्थानक पुर्ण झाले त्याबद्दल धन्यवाद परंतु अंतर्गत सुविधा लवकर पुर्ण करण्याच्या सुचना संबधित विभागाला देण्यात याव्यात अशी मागणी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज परीवहन मंत्री ना अनिल परब यांच्या कडे केली.
आमदार वैभव नाईक यांच्या सह कुडाळ जि प माजी सदस्य संजय भोगटे, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या शिष्टमंडळाने आज ना परब यांची भेट मुंबई येथे घेऊन बलस्थानक बांधण्यासाठी निधी दीला याबद्दल आभार मानले तसेच स्थानका परीसर डांबरीकरण, प्रवाशांना निवारा शेड, सभोवताली स्ट्रीट लाईटची सोय हायमास्ट अशा सुविधा तात्काळ देण्यात याव्यात तसेच परीसरातील धुरळ्यामुळे नागरीक आणि प्रवाशी हैराण झाले आहेत असे सांगुन आम नाईक म्हणाले या बाबत संबधीतांना सुचना देऊन कामे जलदगतीने होतील या कडे लक्ष द्यावेत अशी मागणी करताच ना अनिल परब यांनी सांगितले की सदरची कामे अत्यावश्यक आहेत याची कल्पना आपणांस आहे म्हणून अंतर्गत सुविधांसाठी निधी दीलेला आहे तरीही दीरंगाई का होत आहे याचा तात्काळ आढावा घेऊन सर्व कामे मार्गी लागतील यासाठी संबधीतांना सुचना देण्यात येतील असे सांगून ना परब म्हणाले आमदार वैभव नाईक हे आपल्या मतदार संघातील कामे अग्रक्रमांने मंजुर करुन घेत असतात अशा ही परीस्थित ते जी कामे मागतील ती देण्यासाठी आम्ही कायमच तत्पर असतो असेही ना परब यांनी सांगितले.