पं.स.मालवण व शिक्षक समितीच्या वतीने आयोजन
मसुरे /-
ऐतिहासिक स्थळे व गड किल्ले स्वच्छता मोहीम उपक्रम मालवण पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येत असून बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणच्या वतीने किल्ले भरतगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पर्यटन दृष्टया पोषक असूनही थोडासा दुर्लक्षित राहिलेला परंतु अतिशय सुंदर असलेला किल्ले भरतगड हा भविष्यात पर्यटकांनी फुलून जाईल अशी उपाययोजना करणे गरजेचे आहे.तसेच शिक्षक समिती संघटनेने स्वतःहून पुढाकार घेत हा किल्ला स्वच्छ करून आमच्या उपक्रमास हातभार लावल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी मसुरे येथे केले.
यावेळी सभापती अजिंक्य पाताडे,उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर,गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव,पं.स.सदस्य गायत्री ठाकूर, सरपंच संदीप हडकर, भाजप तालुका अध्यक्ष तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर,विस्तार अधिकारी पी.डी.जाधव,के.टी.पाताडे,श्री.सावंत, ग्रामविकास अधिकारी श्री.शंकर कोळसुलकर,श्री.प्रभुदेसाई,पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम,उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे,तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर,सचिव नवनाथ भोळे,शिक्षक नेते मंगेश कांबळी,पतपेढी संचालक राजेंद्रप्रसाद गाड, कार्याध्यक्ष रुपेश गरुड,उपाध्यक्ष सुहास गावकर,सुयोग धामापूरकर,सल्लागार श्रीकृष्ण सावंत,अरुण गोसावी,जिल्हा प्रतिनिधी विनोद कदम,राजन जोशी,अखिल संघ तालुकाध्यक्ष गुरुनाथ ताम्हणकर मसुरे नं.१ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख,मुख्याध्यापक शर्वरी सावंत तसेच शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नागपूर संस्थेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व पत्रकार संघाच्या मालवण उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी तर आभार नवनाथ भोळे व चंद्रसेन पाताडे यांनी मानले.