राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची महामार्ग प्राधिकरणाला धडक “रात्रीस खेळ चाले” चा वाद पुन्हा पेटणार?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची महामार्ग प्राधिकरणाला धडक “रात्रीस खेळ चाले” चा वाद पुन्हा पेटणार?

सावंतवाडी /-

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिंधुदुर्ग च्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आज धडक दिली मुंबई-गोवा महामार्गवर उभारण्यात आलेल्या बस स्थानकांचे सुशोभीकरण करणायचे काम ठेकेदारांकडून करण्यात येत आहे जेकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत आहे,परंतु “रात्रीस खेळ चाले”या मालिकेच्या प्रमोशनसाठी त्या प्रोडक्शन हाऊस कडून सर्व सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस,सिंधुदुर्ग च्या वतीने मालिकेच्या प्रोडक्शन हाऊस वर गुन्हा दाखल करण्याची व दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली.आपण या प्रकारच्या कृत्याला मुळीच समर्थन करत नाही संबंधीत मालिकेच्या प्रोमोशन टीमवर योग्य ती कार्यवाही करू असे अश्वासन राष्ट्रीय महामार्ग अभियंता श्री.युसूफ तडवी यांनी दिली.या वेळी राष्ट्रवादी चित्रपट सेल जिल्हाअध्यक्ष हार्दिक शिगले,सावंतवाडी युवक तालुकाअध्यक्ष राजू धारपवार
राष्ट्रवादी युवक जिल्हाउपाध्यक्ष अर्षद बेग,प्रथमेश उर्फ मुन्ना दळवी,युवक जिल्हा सरचिटणीस अड.हितेश कुडाळकर,जिल्हा चिटणीस सनी मोरे, कुडाळ-मालवण युवक विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर,राष्ट्रवादी विद्यार्थी सावंतवाडी शहरअध्यक्ष कौस्तुभ नाईक,तालुका सदस्य
तेजस वंजारी,परेश तांबोस्कर,संकेत शेठकर, प्रतीक सावंत,सुमित नाईक,शेलटन नरोना,अर्जुन पताडे,भरत गावकर,अमर धोत्रे व जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..