मसुरे /-
प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे कोविड १९ लसीकरणाचा शुभारंभ रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जी. प. सदस्या सौ. सरोज परब यांच्या हस्ते करण्यात आला. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी ६० वर्षावरील जेष्ठांना लसीकरण करण्यात येणार आहे. ब्लड प्रेशर, मधुमेह असलेल्याना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. यावेळी वैधकीय अधिकारी डॉ दीप्ती सूर्यवंशी, डॉ तृप्ती देसाई, आरोग्य सहाययक संजय नाईक, व्ही. सी. पारकर, सौ योजना परब आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आभार व्ही. सी. पारकर यांनी मानले.