कुडाळ /-
करोना काळात रुग्णांची भरमसाठ वाढ होत असताना, जिल्हा रुग्णालयासह सर्वच आरोग्य यंत्रणेने या आजाराला मुः तोड जवाब दिला. covid-19 सेंटर, जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यांमध्ये या परिस्थितीचा सामना करत होते. कमी मनुष्यबळ असतानाही जिल्हावासीयांना उत्तम सेवा देत होते. काहीवेळा जादा ड्युटी पण करत होते. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी कुटुंबाशी दूर राहून रुग्णांना चांगली सेवा दिली होती. या परिस्थितीचा विचार करून मनसे पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यात 50 निवडक कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा विमा संरक्षण देण्यात आले. भविष्यात कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे, तसेच त्यांच्या कुटुंबांना धीर देण्याचा उद्देश यामागे होता. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष शैलेश शृंगारे, एसटी कामगार सेना उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्या सौजन्याने हा उपक्रम घेण्यात आला .विमा संरक्षण पॉलिसी स्वीकारताना आरोग्य विभागाचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील व कंत्राटी आरोग्य कर्मचारी. या वेळी उपस्थित मनसे उप तालुकाध्यक्ष सचिन ठाकुर, ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब, सिद्धांत बांदेकर, विनित परब, प्रथमेश धुरी, सिध्देश परब,संतोष परब,दिलीप सावंत, सचिन परब पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.