सिंधुदुर्ग /-
कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यासह सर्व ठिकाणी त्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत अजून १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांनी कोकणातला महत्वाचा सण होळी पूर्वी घरकुल पूर्ण करुन होळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करण्याची मनिषा व्यक्त केली. राज्य सरकारने ३१ मार्च पर्यंत अभियानाचा कालावधी वाढवल्याने लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज्यात महाआवास अभियानाची अंमलबजावणी जोरदार सुरु असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियान अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. तीन दिवसांच्या या दौऱ्यात घोगळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त केले असून राज्यस्तरावर अभियानामध्ये जाहीर करण्यात आलेली विविध पारितोषिके पटकावण्यासाठी अभियानामधील इतर उपक्रमांमध्ये प्रगती करण्यावर भर द्यावा असे त्यांनी मत व्यक्त केले. सदर दौऱ्याच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी घोगळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक दिपाली पाटील यांच्याशी अभियानाच्या सकारात्मक प्रगतीबाबत चर्चा केली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग यांनी घोगळे यांचे सिंधुदुर्ग दौऱ्यात जोरदार स्वागत झाले.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदूर्ग चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जगदीश यादव, अधिक्षक विक्रांत गावडे, सहायक लेखा अधिकारी मनोज पिळणकर, जिल्हा प्रोग्रामर श्रध्दा गिरकर, कनिष्ठ सहायक ऋतुराज तळवणेकर, लिपिक कविता परब , डाटा एन्ट्री ऑपरेटर स्मिता मोजरकर आदी उपस्थित होते. घोगळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे संबंधित अधिकारी,कर्मचारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. अभियानाच्या वाढलेल्या कालावधीचा सुदुपयोग करुन ३१ मार्च २०२१ पर्यंत या योजनेमधील सर्व घरकुले पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.या दौऱ्यामध्ये त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती, वर्दे-तालुका कुडाळ, मातोंड – तालुका वेंगुर्ला, इन्सुली – तालुका सावंतवाडी येथे ग्राम पंचायत कार्यालय तसेच लाभार्थ्यांच्या घरकुलांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेऊन चालू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले व अभियानातील इतर उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये भर देऊन लाभार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त घरकुलांबरोबरच लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावण्यावर भर देणेबाबत सूचना दिल्या.संजय घोगळे हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र असून सर्व ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.