कुडाळ /-
पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे कवळ एकच शाखा अभियंता असून संपूर्ण तालुक्याचा डोलारा प्रभारी अभियंता गणेश म्हाडेश्वर यांच्यावर अवलंबून आहे.मग विकास कसा होणार, असा संतप्त सवाल प. स. सदस्य मिलिंद नाईक यांनी करत याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर उपोषणासारखा मार्ग आवलंबू असा इशारा दिला.
आज पंचायत समितीची मासिक सभा सभापती नूतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली खाली पार पडली.भंगसाळ नदीवरील बंधाऱ्या सभोवतालीचा भराव हा ,भरावा अशी मागणी राजन जाधव यांनी केली.मात्र कार्यवाही चालू अहे, असे उत्तर देण्यात आले. मात्र अधिकार्यांना बोलावून घ्या, अशी जावध यांनी सूचना केली. यावेळी मिलिंद नाईक यांनी शाखा अभियंता नसल्याने ग्रामपंचायत, पंचायत समितीची अंदाजपत्रके रखडली आहेत. पर्यायाने तालुक्याची विकास कामे ठप्प झाली आहेत. किमान मुख्यकार्यकारी अधिकार्यांना भेटून याबाबत तोडगा काढा. तालुक्याच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येत परिस्थिती वरिष्ठ अधिकार्यांसमोर मांडूया अशी आर्त विनवणी यावेळी वारंग यांनी केली. या त्यांच्या विनंती ला सर्वानीच पाठिंबा दिला.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई उपस्थित होते. तसेच मिलिंद नाईक, राजन जाधव, अरविंद परब, गोपाळ हरमलकर, संदेश नाईक, सुबोध माधव, सुप्रिया वालावलकर, श्रेया परब, मथुरा राऊळ, शरयू घाडी, स्वप्ना वारंग, बाळकृष्ण मडव आदु सदस्य उपस्थित होते.