वेंगुर्ला /-
ठाकर आदिवासी समाजाची वारली चित्रकथी कला व कळसुत्री बाहुल्या ही काळाच्या ओघात लोप पावत चाललेली पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी गेली पन्नास वर्षे तिचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र परशुराम गंगावणे यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदयात्री वाङमय मंडळ व श्री देवी सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ले यांच्या वतीने पिंगुळी गुढीपूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.परशुराम गंगावणे यांनी चित्रकथी कला व कळसुत्री बाहुल्या ही कला फक्त जिवंत न ठेवता तिचा संपूर्ण भारतभर व परदेशात प्रचार व प्रसार केला व सिंधुदुर्ग चे नाव अजरामर केले.त्यामुळे त्यांचा हा सन्मान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे असे गौरवोदगार आनंदयात्री वाङमय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी काढले.यावेळी सर्वानी चित्रकथी संग्रहालयास भेट दिली.चेतन गंगावणे व एकनाथ गंगावणे यांनी चित्रकथी संग्रहालयाची व काश्याच्या ताटावर मेन लावून बनविलेल्या वाद्याची माहिती सविस्तर सांगितली.यावेळी आनंदयात्री मंडळाच्या अध्यक्षा वृंदा कांबळी,सातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईक, सचिव रविंद्र परब,प्रा.सचिन परुळकर, संजय पाटील,महेश राऊळ,अवधूत नाईक, पी.के.कुबल,सुनील जाधव, स्वप्नील वेंगुर्लेकर, कवी विनय सौदागर, प्राजक्ता आपटे, दुर्वा नांदोसकर, प्रितम ओगले,साप्ताहिक किरातच्या संपादिका सीमा मराठे आदी आनंदयात्री उपस्थित होते.