कणकवली /

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यापुढे कणकवली शहरातील मंगळवारचा आठवडा बाजार बंद असणार आहे. तसेच कोरोना संदर्भातच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विनामास्क फिरणाऱयांच्या विरोधात २०० ऐवजी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गेले चार दिवस सातत्याने नगरपंचायत कडून विनामास्क फिरणाऱ्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून दंड वसूल झाला. मात्र दंड वसूल करणे हे नगरपंचायतचे उद्दिष्ट नसून, लोकांनी मास्कचा वापर करावा, याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी असेही नलावडे यांनी सांगितले. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार बंद असला तरीही दर मंगळवारी कणकवली शहरात बाजारासाठी होणारी गर्दी विचारात घेता, येत्या मंगळवारपासून कणकवली शहरात आठवडा बाजारासाठी जिल्हा व तालुक्या बाहेरून येणाऱ्या भाजी, फळ, फूल व अन्य विक्रेत्यांना शहरात दुकाने लावण्या मनाई करण्यात आली आहे. याबाबत संबंधित तालुक्या, जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या दुकानदारांना, विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली. आठवडा बाजार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत जिल्हा व तालुक्यात बाहेरील विक्रेत्यांना शहरात मंगळवारीची दुकाने लावण्यास सक्त मनाई असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायत ला सहकार्य करावे. तसेच कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page