ओरोस /-
आज स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या विश्वस्त आणि संचालक यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग येथील सुरक्षा रक्षक स्त्री कर्मचारी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडून झाल्याच्या तक्रारी बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटून निवेदन देण्यात आले.
सक्षम महिला अधिकारी मार्फत सखोल चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली.
स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ.जान्हवी सावंत, कोषाध्यक्षा सौ.पूनम चव्हाण, सह.कोषाध्यक्षा सौ.श्रेया गवंडे, विश्वस्त सौ.स्नेहा दळवी, संचालक सौ.श्वेता सावंत, व सदस्य सौ.मंगल ओरसकर या शिष्टमंडळाने भेट घेतली.