सिंधुदुर्गनगरी /-
20 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह ओरोस, सिंधुदुर्ग येथून मोटारीने अणाव ता. कुडाळ जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. लोकसहभागातून निराधार बांधवांसाठी बांधलेल्या वृध्दाश्रम इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- अणाव ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) दुपारी 12.00 वा. अणाव, ता. कुडाळ येथून मोटारीने कुडाळ जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. 6 व्या कुडाळेश्वर क्रीडा महोत्सव (KPL- 2021) कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- कुडाळ हायस्कूल क्रीडागंण, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग). दुपारी 12.45 वा. कुडाळ येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 01.00 वा. राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा- सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- माध्यमिक शिक्षक पतपेढी, ओरोस, सिंधुदुर्ग. दुपारी 01.30 वा. ओरोस, सिंधुदुर्ग येथून मोटारीने नांदगाव ता. कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. हॉटेल आस्वाद उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- नांदगाव हायवे नजिक, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) सोईनुसार नांदगाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.