मसुरे /-
पळसंब येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्री जयंती देवी मंदिर येथून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्यानतंर पळसंब शाळा येथे महाराज्यांच्या पुतळ्याला श्री . योगेश कापडी यानी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरपंच चद्रकांत गोलतकर शालेय अध्यक्ष रवीकांत सावंत , पवार मॅडम , प्रमोद सावंत , शिवभक्त, महिला वर्ग , तरुण वर्ग मोठ्या सख्येने उपस्थित होते . त्यानतर श्री दिनेश परब , प्रमोद सावंत यानी महाराजां विषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वरधारा ग्रुप आचरा बौध्दवाडी यांनी अफझलखानाचा वध या पोवाडयाचे अप्रतिम सादरीकरण केले. त्यावेळी अनुराधा आचरेकर , मंदार आचरेकर , बाळू आचरेकर , नंदिनी आचरेकर , स्नेहा काबंळी , सर्व कलाकार उपस्थित होते. सरपंच गोलतकर यांनी आभार मानले.